‘समान नागरी कायदा’ जितका ‘कायदा’ म्हणून आवश्यक आहे, त्याहून कितीतरी अधिक तो ‘सुधारणेचा कार्यक्रम’ आहे, ‘सांस्कृतिक क्रांती’चा अजेंडा आहे…

हिंदूंमधील कट्टरतावादी अलीकडे ‘समान नागरी कायद्या’ची मागणी फार आग्रहाने करू लागले आहेत. ज्या जमातीने स्वातंत्र्यानंतर लगेचच हिंदू समाजातील महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणण्यात आलेल्या ‘हिंदू कोड बिला’विरोधात तुफान उठवले होते. एरवीसुद्धा ही मंडळी हिंदू समाजातील कुप्रथांविरोधात कोणतेच पाऊल उचलत नाहीत, परंतु अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम समाजातील अनिष्ट रीतीरिवाजांच्या विरोधात सुधारक बनून फिरत राहतात.......